no images were found
पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमंती
आदिलशाही फौजेपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करण्यासाठी वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी प्राणाचं बलिदान दिलं.
त्या प्रेरणादायी, दैदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी ‘कोल्हापूर हायकर्स’च्या वतीनं पन्हाळगड-पावनखिंड- विशाळगड पदभ्रमंती मोहिम आयोजित करण्यात आली असून तिचा प्रारंभ ऐतिहासिक पन्हाळगडावर झाला.
या पदभ्रमंती मोहिमेत देशभरातून सुमारे ४०० शिवभक्त मावळे सहभागी झाले होते.
हुकूमतपन्हा रामचंद्रपन्त अमात्य बावडेकर यांचे १३ वे वंशज नीलराजे बावडेकर, बडोदा इथल्या श्री छत्रपती शिवाजी सहकारी मंडळीचे अध्यक्ष गौरव पवळे, नरवीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदा काशीद, शिवव्याख्याते संतोष झामरे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंडे-जाधव यांच्या हस्ते वीर शिवा काशीद यांच्या समाधीचं आणि पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून या पदभ्रमंतीस सुरुवात झाली.
यावेळी पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, हेमंत साळोखे अखिल भारतीय शिवराज्य अभिषेक सोहळा समिती – कार्याध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनरिंग असोसिएशन – उपाध्यक्ष शिवरायांचे सरदार गोदाजीराव जगताप यांच्या घराण्यातील विठ्ठल देशमुख, मोडी लिपी अभ्यासक अमित आडसुळ, पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष नितीन भगवान यांची प्रमुख उपस्थिती होती.