no images were found
पावसाळ्यात पात्रं करणार वादळाचा सामना!
या आठवड्यात एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मधील पात्रं पावसाळ्यामध्ये भिजण्याचा आनंद घेणार आहेत, पण हा आनंद घेताना मोठ्या दुविधेत सापडतील. यामागील कारण जाणण्यासाठी पुढे वाचा.
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील आगामी एपिसोडबाबत कटोरी अम्मा ऊर्फ हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “दरोगा हप्पू सिंगला (योगेश त्रिपाठी) पावसाळ्यात गरमागरम आणि कुरकुरीत भजी खावीशी वाटते आणि तो राजेशला (गीतांजली मिश्रा) भजी करायला सांगतो. पण दर पावसाळ्यात भजी बनवून कंटाळलेली राजेश यावेळी ठामपणे नकार देते, ज्यामुळे हप्पू निराश होतो. दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये हप्पूकडे एक विचित्र तक्रार येते. एक पुरूष आरोप करतो की त्याची पत्नी त्यांच्या शेजाऱ्याला भजी खायला घालत राहते आणि हे असेच चालू राहिले तर तो रागाच्या भरात शेजाऱ्याला इजा करू शकतो! तो हप्पूला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी कारवाई करून शेजाऱ्याला थांबवण्याची विनंती करतो. घरी परतल्यावर, हप्पू त्याच रात्री पुन्हा एकदा राजेशकडे भजी करण्याची विनंती करतो, पण ती भजी करण्यास नकार देते. दुसऱ्या दिवशी राजेश रस्त्यावरून जात असताना चोर तिची पर्स हिसकावून घेतो. हप्पूच्या वयाचा एक धाडसी पोलीस अधिकारी धाडसाने चोराला पकडतो आणि पर्स तिला परत करतो. राजेशला पाहून अधिकारी भावूक होतो आणि सांगतो की ती त्याच्या दिवंगत बहिणीसारखी दिसते. पावसाळ्यात ती त्याला भजी खायला द्यायची याची देखील आठवण सांगतो. राजेश भावूक होत आणि त्याला संध्याकाळी उशिरा त्याच ठिकाणी भेटण्यासाठी आमंत्रित करते. त्या संध्याकाळी, हप्पू स्वयंपाकघरात येतो आणि राजेशला भजी तळताना पाहतो. ती शेवटी त्याच्यासाठी भजी बनवत आहे असे त्याला वाटते आणि त्याला खूप आनंद होतो. पण तो काहीही बोलण्यापूर्वी राजेश घराबाहेर जात म्हणते की ती उशीरा येईल, ज्यामुळे हप्पू गोंधळून जातो आणि त्याला संशय येतो. विरोध न करू शकलेला हप्पू तिच्या मागे जातो, ज्यानंतर त्याला कळते की ती त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी इन्स्पेक्टर भंडारीला (पवन कुमार सिंग) भजी खाऊ घालत आहे! हप्पूला धक्का बसतो आणि दुखावतो. ड्रामा अधिक प्रखर होतो, जेथे मध्यरात्री राजेशला भंडारीचा फोन येतो, ज्यामुळे हप्पूला अधिक असुरक्षित वाटते. तो त्याचा जवळचा मित्र आणि वकील बेनीला (विश्वनाथ चॅटर्जी) याबाबत सर्वकाही सांगतो. स्वत:च्या पत्नीला कंटाळलेले दोघेही विचित्र योजना आखतात: बेनी स्वतः महिलेचा वेषांतर करतो आणि हप्पू राजेशला हेवा वाटावा म्हणून तिच्या प्रेमात पडल्याचे नाटक करतो. पण त्यांची योजना त्यांच्यावर उलटते. राजेश त्यांना रंगेहात पकडते आणि कटोरी अम्माकडे (हिमानी शिवपुरी) जाते. ती हप्पू तिला फसवत असल्याने घर सोडून जात असल्याचे सांगते. अम्मा रागावते आणि हप्पूला फटकारते. या कठीण परिस्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी हप्पू काय करेल?”
मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील आगामी एपिसोडबाबत मनमोहन तिवारी ऊर्फ रोहिताश्व गौड म्हणाले, “अम्माजी (सोमा राठोड) अंगूरी भाबीला (शुभांगी अत्रे) गर्भधारणेसाठी अनोखा टोटका (उपाय) सांगते की, तिला तिचा पती मनमोहन तिवारीसोबत (रोहिताश्व गौड) पावसात नृत्य करावे लागेल. अंगूरी अम्माच्या सल्ल्याचे पालन करण्याचे ठरवते. दरम्यान विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) त्यांची योजना ऐकतो आणि त्यांची योजना अयशस्वी करण्याचे ठरवतो. तो त्याचा मित्र रवी दुबेला (चयन त्रिवेदी) कॉल करतो, जो हवामान विभागामध्ये काम करतो आणि त्याला पावसाबाबत आगाऊ माहिती देण्यास सांगतो. पण प्रत्येक वेळी रवी विभुतीला दक्ष करण्यासाठी कॉल करतो तेव्हा विभुती ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेला असतो, पोलीसांशी सामना करत असतो किंवा हॉस्पिटलमध्ये अडकलेला असतो आणि तो येईपर्यंत पाऊस थांबलेला असतो. टोटकामध्ये अडथळा आणण्यासाठी त्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरतो. दुसरीकडे तिवारी रोमँटिक पावसाळी दिवसाचे स्वप्न पाहतो, जेथे अनिता भाबी (विदिशा श्रीवास्तव) त्याला प्रेमाने भजी खायला देत आहे. या स्वप्नामध्ये गुंगून गेलेला तिवारी अनिताला त्याच्यासाठी भजी बनवण्यास समजावण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. प्रत्येक वेळी पाऊस पडल्यानंतर अंगूरी नृत्य करण्यासाठी तिवारीला शोधते, पण तिवारी तेथून पळ काढतो आणि अनितासोबत भजी खाण्याचे स्वप्न पाहत राहतो. ज्यामुळे अम्माचा टोटका कधीच पूर्ण होत नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिवारी वेषांतर करतो आणि अनिताच्या व्यवसायामध्ये रूची असलेला श्रीमंत गुंतवणूकदार असण्याचे नाटक करतो. तो एका अटीवर गुंतवणूक करण्याची ऑफर देतो, ती म्हणजे अनिताने तिच्या स्वत:च्या हाताने बनवलेल्या भजी खायला द्याव्या. अनिता भजी बनवणार असताना खरा गुंतवणूकदार तिला फोन करतो. सत्य समोर येते आणि तिवारीचा प्लॅन उघडकीस येतो. दरम्यान, पुन्हा पाऊस पडायला सुरूवात होते आणि अंगूरी आग्रह करते की तिवारीने अम्माचा टोटका पूर्ण करावा. अंगूरी गरोदर राहण्याच्या ठाम विरोधात असलेला विभुती धावत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण वीज कडाडते आणि त्याच्यावर पडते. तिवारी व अंगूरी पावसात नृत्य करण्यासाठी जातात तेव्हा तिवारी पाय घसरून पडतो आणि त्याच्या पाठीला दुखापत होते.”