no images were found
जमाई नं. 1 मधील आपल्या कोर्टरूम अॅक्टसाठी सज्ज झाली आहे सिमरन कौर!
झी टीव्हीवरील गाजलेली कौटुंबिक मालिका जमाई नं. 1 सुरुवातीपासूनच आपल्या ट्विस्ट्स आणि भावनिक चढउतारांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आता या कथेत एक नवे नाट्यमय वळण येत आहे, ज्यामध्ये रिद्धी (सिमरन कौर) आपला पती नीलला (अभिषेक मलिक) वाचवण्यासाठी कोर्टात उभी राहणार आहे, त्याच्यावर सायली (सोनल वेंगुर्लेकर) कडून खोटे आणि गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आगामी एपिसोडमध्ये काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत – सिमरनचे पात्र एका समर्पित पत्नीपासून न्यायासाठी लढणाऱ्या आक्रमक वकिलामध्ये रूपांतरित होणार आहे.
हे खास ठरतंय कारण सिमरन ऑनस्क्रीन एका वकीलाची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि हे पात्र वास्तवदर्शी वाटावे यासाठी तिने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. आपली ही कायदेशीर भूमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी तिने काही कोर्टरूम ड्रामा पाहिले, जेणेकरून ती ही जबाबदारी समर्थपणे निभावू शकेल. यात तिच्यासाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत ठरला बॉलीवूडचा समीक्षात्मकांनी प्रशंसा केलेला चित्रपट ऐतराज़, ज्यात करिना कपूर खानने अॅडव्होकेट प्रिया सक्सेना मल्होत्राची लक्षवेधी भूमिका केली होती, जिला तिच्या पतीला गंभीर छळवणुकीच्या आरोपांपासून वाचवायचं होतं. जमाई नं. 1 मध्ये सिमरननेही हीच ऊर्जा रिद्धीच्या पात्रात आणली आहे, जिच्याद्वारे अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या स्त्रीची ठाम आणि भावनिक ताकद दाखवण्यात आली आहे.
आपल्या तयारीबाबत सिमरन कौर म्हणाली, “जेव्हा मला समजले की रिद्धी कोर्टात नीलची केस लढणार आहे, तेव्हा मी खूप उत्साहित झाले. कारण ही कहाणी एक जोरदार वळण घेणार होती – भावनिकरित्या कोलमडलेली स्त्री शांतता मिळवत पुन्हा उभी राहते आणि न्यायासाठी कोर्टात उभी राहते, ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायक ठरणार होती. त्यामुळे वकिलाची भूमिका साकारताना मी तिचे देहबोली, उच्चार आणि तिच्या आत्मविश्वासावर काम केले. यासाठी मी काही कोर्टरूम ड्रामा विशेषतः ऐतराज़ पाहिला. करिनाने कोर्टात जे सशक्त आणि नैतिकतेने भरलेले सादरीकरण केले ते माझ्यासाठी मार्गदर्शक ठरले.”
ती पुढे म्हणाली, “हे फक्त संवाद लक्षात ठेवण्याचे काम नव्हते – तर एक ठसा उमटवण्याची गोष्ट होती. मी सादरीकरण कसे असावे यासाठी टीमसोबत काम केले, भरपूर रिहर्सल केली आणि कुठे थांबायचं, कसे बोलायचे याचीही तयारी केली, जेणेकरून मी एक खरीखुरी कोर्टरूम वकील वाटावे. मला आशा आहे की, रिद्धी पात्रात मी जी प्रामाणिकता आणि ऊर्जा आणली आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हा ट्रॅक माझ्या पात्रासाठी आजवरच्या सर्वात प्रभावी ट्रॅकमधला एक ठरेल.”
आता ही मालिका एका कायदेशीर संघर्षात प्रवेश करत आहे, जो याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. पण रिद्धी सायलीच्या खोटेपणाच्या जाळ्यातून बाहेर पडून नीलला निर्दोष सिद्ध करू शकेल का? की सायलीच्या धूर्त डावातच कोर्टरूम नाट्य अडकून पडेल?