Home सामाजिक डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची आयएसएआरच्या अध्यक्षपदी निवड

डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची आयएसएआरच्या अध्यक्षपदी निवड

6 second read
0
0
38

no images were found

डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची आयएसएआरच्या अध्यक्षपदी निवड

कोल्हापूर  – कोल्हापूरला कायम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची महाराष्ट्र चॅप्टरच्या आयएसएआरच्या (Indian Society of Assisted Reproduction) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे बहुमानाचे पद डॉ. पद्मा रेखा जिरगे यांना आज नागपूर येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये बहाल करण्यात आले आहे.

या परिषदेत डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी वंध्यत्व क्षेत्रातील सध्याच्या व भविष्यातील विविध पैलूंवर मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. पद्मा रेखा जिरगे विविध संशोधन तसेच प्रत्यक्ष रुग्ण उपचार याद्वारे कायमच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडत आहेत. वंध्यत्व उपचारांमध्ये त्यांचे संशोधन हे नक्कीच अनेक पेशंटससाठी वंध्यत्व निवारण करण्यासाठी बहुमोल ठरत आहे. कोल्हापूरसाठी डॉ. पद्मा रेखा जिरगे यांची निवड खूप अभिमानास्पद आहे.

पुढील दोन वर्षे डॉ. पद्मा रेखा जिरगे हा पदभार सांभाळतील. वंध्यत्व रुग्णांना यशस्वी व सर्वोत्तम उपचार देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्वांसाठीच त्यांची ही निवड सार्थ ठरणार आहे. या दोन वर्षांत त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यात पुढील गोष्टींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले.

यानुसार आयव्हीएफ स्पेशालिस्टना आयव्हीएफ सेवा देण्यासाठी गरजेचे असणारे सर्व प्रकारचे अद्ययावत व प्रगत एज्युकेशनल मटेरियल उपलब्ध करून देण्यात येईल. आयव्हीएफ क्षेत्रात काम करणारे व या क्षेत्राचा कणा असणारे Embryologist यांना ट्रबल शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येईल. आयव्हीएफ नर्सेस हा देखील या क्षेत्राचा खूप महत्त्वाचा भाग असून त्यांची भूमिका त्यांनी अधिक सक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने एक Uniform online programme चे आयोजन केले जाईल. सर्व स्टाफसाठी प्रोफर्टिलिटी, कौन्सिलिंगसाठी एक प्रोग्राम आयोजित केला जाईल. दरम्यान, पुढील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला आयव्हीएफ क्षेत्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी डॉ. जिरगे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …