no images were found
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात
पुणे : आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत. आज दुपारीच गोऱ्हे यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.