no images were found
राहुल गांधींची पुनर्विचार याचिका हायकोर्टानं फेटाळली
अहमदाबाद : मोदी यांच्या आडनावाचा वापर करुन बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित विधानासाठी राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही गेले. सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयात आव्हान दिलं, मात्र तेथून दिलासा न मिळाल्याने राहुल गांधी यांनी हायकोर्टाचं दार ठोठावलं.
राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं ही फेटाळून लावत त्यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याची माहिती मिळाली आहे.