
no images were found
डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.१७ टक्के
कसबा बावडा/ वार्ताहर :- बारावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेत कौस्तुभ नागवेकर याने ९२.१७ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. वरद सरोळकर याने ९२.५० टक्के गुणासह द्वितीय, वसुंधरा इंगवले हिने ९१.३३ टक्के गुणासह तृतीय, आकांक्षा देशमुख हिने ८८.३३ टक्के गुणांसह चौथा तर मानसी कीर्तानिया हिने ८७.८३ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
वाणिज्य शाखेत तनया गुळवणी हिने ९५.८३ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. माहिया मुल्ला हिने ९५.६७ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. सई शिंदे हिने ९४.३३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले.
त्याचबरोबर अनघा कुलकर्णी, तनिष्का डोंगळे, मुग्धा पोतदार, जान्हवी ओसवाल, मानसी किर्तानिया, पूर्वा शिंदे या विद्यार्थिनीनी भूगर्भशास्त्र विषयामध्ये मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.