no images were found
डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय पातळीवर यश
कसबा बावडा/वार्ताहर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाची तृतीय वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा राजेश पाटील हिला नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडन्टस ऑफ आर्किटेक्चर (नासा)च्या वतीने गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
ऋतुजाने कॉलेजची युनिट सेक्रेटरी म्हणून काम करत असताना कोल्हापूर,सांगली, सातारा या झोन मधील कॉलेजसाठी विविध वर्कशॉप , हेरिटेज वॉक पन्हाळा या सारख्या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले आहे. त्याचबरोबर नासा इंडिया विविध उपक्रमामध्ये तिचा उत्स्फूर्त सहभाग होतो. या माध्यमातून तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिचा गौरव करण्या आला. लव्हली युनिव्हर्सिटी, चंदीगड येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय संमेलनात गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यानी अभिनंदन केले. विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव, नासा प्रमुख प्रा. शैलेश कडोलकर व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.