Home मनोरंजन ‘गणेश कार्तिकेय’ – या ब्रह्मांडातील दिव्य परिवाराची महान गाथा

‘गणेश कार्तिकेय’ – या ब्रह्मांडातील दिव्य परिवाराची महान गाथा

9 second read
0
0
50

no images were found

‘गणेश कार्तिकेय’ – या ब्रह्मांडातील दिव्य परिवाराची महान गाथा

      सोनी सब लवकरच घेऊन येत आहे एक भव्य मालिका ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’. या ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली आणि दिव्य देवांच्या परिवाराची महान गाथा ही मालिका सादर करेल. ही मालिका प्रामुख्याने भगवान शिव, देवी पार्वती आणि त्यांची मुले गणेश आणि कार्तिकेय यांच्या माहीत नसलेल्या कथा सादर करेल. जीवनातील कसोट्यांना आणि आव्हानांना तोंड देऊन समस्त मानवतेला मार्गदर्शन आणि सामर्थ्य देणाऱ्या कुटुंबाची ही कहाणी आहे.

          दिव्य कथा मांडणारी ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील एक भव्य मालिका असेल. या मालिकेत शिवाच्या भूमिकेत मोहित मलिक, पार्वतीच्या रूपात श्रेनू पारेख तर गणेश आणि कार्तिकेय यांच्या भूमिकेत अनुक्रमे आयुध भानुशाली आणि सुभान खान दिसणार आहेत.

     प्रस्तुत मालिकेविषयी बोलताना मोहित मलिक म्हणतो, “‘गणेश कार्तिकेय’ ही मूलतः शिव-पार्वती, आणि त्यांची मुले गणेश व कार्तिकेय या कुटुंबाची कहाणी आहे. शंकर आणि पार्वतीच्या त्यांच्या मुलांशी असलेल्या नात्यामधून ही मालिका प्रत्येक माता-पित्याच्या अनुभवाचा शोध घेते, मग परिस्थिती कशीही असो- प्रेमाचा वर्षाव असो, संघर्षाची वेदना असो किंवा कुटुंबाला एकत्र ठेवण्याची आशा असो. केवळ भक्ती नाही तर नात्यांमधील सौंदर्य आणि एकत्रित असल्याची ताकद दर्शविणाऱ्या या मालिकेचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…