Home Uncategorized महापालिकेच्यावतीने कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

महापालिकेच्यावतीने कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

20 second read
0
0
35

no images were found

महापालिकेच्यावतीने कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : शहरातील स्वच्छतेस बाधा आणणाऱ्या कचरा उघड्यावर टाकणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने  दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आज जयंती पंपिंग स्टेशन ते महावीर उद्यान परिसरात मयुरी पाटील यांनी उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना रु.600/- चा दंड करण्यात आला. या मुख्य रस्त्यावर वारंवार सूचना देऊनही अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने येथे सकाळपासून एक कर्मचारी नेमला होता. दुपारी या ठिकाणी एका ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यासाठी आणलेचे आढळून आले. संबंधित ट्रॅक्टर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पकडून त्यावर रु.5,000/- इतक्या दंडाची कारवाई करण्यात आली.

            ही कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, मुनीर फरास यांच्या पथकाने केली.

            तरी नागरिकांनी  कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या (घंटा गाडी ) वाहनांकडेच देणेचा आहे. अन्यथा सदरचा कचरा इतरत्र उघड्यावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.    

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …