no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने पश्चिम विभागात ‘मान्सून मॅजिक’ कॅम्पेनची घोषणा केली
बंगळुरू – टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने ग्राहक केंद्रीत आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या अथक प्रयत्नात, या पावसाळ्यात त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध विशेष सवलती आणि फायदे ऑफर करण्यासाठी ‘मान्सून मॅजिक विथ टोयोटा’ ची घोषणा केली आहे. या श्रेणीतील सेवांमध्ये जुलै 2023 च्या संपूर्ण महिन्यासाठी पश्चिम राज्यांमध्ये सर्वसमावेशक वाहन आरोग्य तपासणी पासून ते घरोघरी सेवा देणे उपलब्ध आहे.
सुरक्षितता मानके, अपवादात्मक दर्जाची उत्पादने आणि उत्कृष्ट सेवा अनुभव, यासाठी बेंचमार्क सेट केलेली कंपनी म्हणून, हा ‘मान्सून मॅजिक विथ टोयोटा’ अनेक ग्राहक केंद्रित उपक्रमांपैकी एक आहे ज्याचे उद्दिष्ट मूल्यवर्धित सेवा वितरीत करणे आणि एकूण ग्राहक अनुभव वाढवणे हे आहे.
– कार केअर ट्रीटमेंटवर आकर्षक ऑफर
श्री राजेश मेनन, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे जनरल मॅनेजर असोसिएट/हेड ऑफ वेस्टर्न रिजन या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “आम्हाला आमच्या ग्राहकांना अपवादात्मक मूल्य आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘मान्सून मॅजिक विथ टोयोटा’ ची घोषणा करताना आनंद होत आहे. पावसाळ्यात त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्याला आम्ही अत्यंत महत्त्व देतो, आणि ग्राहकांच्या अनुभवाला नवीन उंचीवर नेण्यासाठी डिझाइन केलेल्या फायद्यांची विस्तृत श्रेणी आम्ही काळजीपूर्वक तयार केली आहे. या सिझन मध्ये ग्राहकांना एक अनोखा अनुभव देऊन आणि त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करताना, पावसाळ्यात पश्चिम विभागातील आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे अटळ ध्येय या सगळ्यपलीकडे जाऊन एकूण ग्राहक अनुभव वाढवणाऱ्या मूल्यवर्धित सेवा प्रदान करणे, आणि मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर पूर्ण समाधान सुनिश्चित करणे हे आहे.”