no images were found
वॉर्डविझार्ड इंडिया होरेका एक्स्पो मध्ये क्विकशेफ आणि स्नॅक बडीची रिटेल व होरेका उत्पादने सादर करणार
मुंबई –वॉर्डविझार्ड फुड अँड बेव्हरेजेस लि. या खाद्यपदार्थ व बेव्हरेजेस क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने होरेका २०२३ मध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. आज सुरू होत असलेले हे प्रदर्शन ५ ते ७ जुलै २०२३ दरम्यान भारतातील तमिळ नाडू येथील कोडीशिया ट्रेड फेयर कॉम्प्लेक्स, कोईम्बतूर येथे भरवले जाणार आहे.
इंडिया होरेका एक्स्पो हे प्रीमियम एक्झिबिशन हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग (हो-रे-का) क्षेत्रावर आधारित असून त्यामध्ये देशभरातून या क्षेत्रातील व्यावसायिक, पुरवठादार, धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. या प्रतिष्ठित प्रदर्शनामध्ये सहभागी होताना वॉर्डविझार्ड फूड अँड बेव्हरेजेस लि. कंपनीला आनंद होत आहे. कंपनी या प्रदर्शनात क्विकशेफ आणि स्नॅक बडीची संपूर्ण रिटेल आणि होरेका उत्पादन श्रेणी सादर करणार आहे. त्यामध्ये आरटीई उत्पादने, फ्रोझन उत्पादने, सॉसेस आणि काँडीमेंट्स यांचा समावेश असेल.
इंडिया होरेका एक्स्पो २०२३ मधल्या सहभागाविषयी वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शीतल भालेराव म्हणाल्या, ‘इंडिया होरेका एक्स्पो २०२३ मध्ये विस्तृत उत्पादनश्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे प्रसिद्ध ब्रँड क्विकशेफ आणि स्नॅक बडी सादर करण्यासाठी तसेच होरेका श्रेणी लाँच करण्यासाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसमोर आमची नाविन्यपूर्णआणि दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी तसेच यानिमित्ताने नव्या व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यासह कंपनी नव्या बाजारपेठांमध्ये उतरण्यासाठी सज्ज होत असून लवकरच कोईम्बतूरमध्ये आपली उत्पादने उपलब्ध करणार आहे.’
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसतर्फे ग्राहकांना सोयीस्कर आणि चविष्ट पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. क्विकशेफची उत्पादनेवैविध्यपूर्ण असून त्यात प्रत्येकाला आवडीचे पदार्थ मिळतील याची खात्री करण्यात आली आहे, तर स्नॅक बडीचे सॉसेस कोणत्याही पदार्थाच्या चवीचा स्वाद आणखी खुलवतात. होरेका श्रेणी सादर करून कंपनीने या उद्योगाला दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपली आहे.
इंडिया होरेका एक्स्पो २०२३ मध्ये सहभागी होताना वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसने या उद्योगातील व्यावसायिकांशी संवाद साधण्याचे, नव्या भागिदारी स्थापन करण्याचे तसेच व्यवसाय विस्तारण्याचे ध्येय ठेवले आहे. या प्रदर्शनाच्या यशासाठी योगदान देण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.