Home शासकीय नगररचना विभागाकडील तक्रारी गुरुवार दि.8 व 15 तारखेला आयुक्त कार्यालयात स्विकारणार

नगररचना विभागाकडील तक्रारी गुरुवार दि.8 व 15 तारखेला आयुक्त कार्यालयात स्विकारणार

2 second read
0
0
43

no images were found

नगररचना विभागाकडील तक्रारी गुरुवार दि.8 15 तारखेला आयुक्त कार्यालयात स्विकारणार

कोल्हापूर :  नगररचना विभागाकडील कामांबाबत व तक्रारींबाबत नागरीकांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे नगररचना कार्यालयात दर गुरुवारी दुपारी 3.30 ते 5.30 या कालावधीत भेटतात. शासन परिपत्रकानुसार शहरातील नागरिकांना भेटणेसाठी महापालिकेने बुधवार व गुरुवार असे दोन दिवशी निश्चित केलेले आहेत. महापालिका प्रशासक तथा आयुक्त नागरीकांच्या तक्रारींची, कामाची दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने बुधवारी आयुक्त कार्यालयात व गुरुवारी नगररचना कार्यालयात भेटतात. परंतु काही अरिहार्य कारणामुळे गुरुवार दि.8 व दि.15 डिसेंबर रोजी प्रशासक नगररचना कार्यालया एैवजी आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. तरी नागरीकांनी या दोन्ही दिवशी नगरचना कार्यालयात न जाता आयुक्त कार्यालयात भेटण्यासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…