
no images were found
एका संस्थेच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी : रिपब्लिकन पार्टीची मागणी
कोल्हापूर : येथील एका समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी या समाजास मोक्याची जागा दिलेली आहे. या मोक्याच्या जागेवर व्यवसायिक गाळे या संस्थेने बांधले व त्याद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण केले. या संस्थेच्या कारभारात काही अपप्रवृत्तीच्या सांचालकांनी विळखा घालून मुल उद्देश गुंडाळून ठेवला आहे. या ठिकाणी मनमानी कारभार सुरु केला आहे. या कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा नेते सतिश माळगे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.
३० वर्षाहून अधिक काळ या संस्थेत संचालक मंडळ अस्थित्वात नव्ह्ते तरीदेखील लाखो रुपयांची उलाढाल गालेधारकांकडून करण्यात आली. या संस्थेची नुकतीच झालेली निवडणूक वादात असताना तथाकथित संचालकांनी गैरकारभाराचा कळस गाठला आहे. संस्थेच्या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्त यांना रीतसर तक्रार दिली असून या प्रकरणात न्याय मिळावा. या संस्थांवर लक्ष ठेवणारा धर्मादाय विभाग हा या संस्थेकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. त्याप्रमाणे या संस्थेतील तथाकथित संचालक हे प्रभावशाली असून गैरकारभार दडपुन टाकण्याची शक्यता आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेल्या सामाजिक हिताच्या या संस्थेचा कारभार त्यंना अपेक्षित असा होईपर्यंत आमचा लढा सुरु राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा नेते सतिश माळगे यांनी केली आहे. या निवेदनावर प्रदीप ढाले, दत्ता पाटील, रणजीत कांबळे, राजू घोरपडे, गौतम लोकरे यांच्या सह्या आहेत.