no images were found
आमचा निवडणूक आयोगावर विश्वास :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार शरद पवार
नवी दिल्ली :- कुणी काही नियुक्त्या केल्या त्याला अर्थ नाही. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे केले आहे.
दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणा पीसी चाको यांनी केली आहे.
खासदार शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज 8 ठराव पारित केले. समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
पक्षाच्या 27 राज्य समित्यांपैकी एकाही समितीने आपण शरद पवार यांच्यासोबत नसल्याचे सांगितले नाही. संघटना अबाधित आहे, असे चाको म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.