
no images were found
1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावरील अपघाताचा सर्वात मोठा खुलासा
बुलडाणा : 1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 खासगी बसचा भीषण अपघात झाला.
ही बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला. हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र, इतर 25 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या बस अपघातप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. बुलढाणा बस अपघातात बसचा चालक दारूच्या नशेत होता, असे अहवालात उघड झाले आहे. रक्तामध्ये अल्कोहोल असल्याचा पुरावा आढळला आहे.या खुलाशाने एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाण्यातील सिंदखेड इथे विदर्भ ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातातील प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख न पटल्याने 25 पैकी 24 मृतदेहांवर 2 जुलै सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.