no images were found
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ते दोन्ही बंधू एकत्र येणार: सूत्रांची माहिती
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे.
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला आहे.