
no images were found
कलाकारांनी नववर्ष पार्टीसाठी सांगितल्या फॅशन टिप्स!
सर्वजण स्टाइलमध्ये नववर्ष २०२५ चे स्वागत करण्यासाठी सज्ज असताना पार्टी प्लान्स जल्लोषात सुरू आहेत. पण मनात एक चिंता नेहमी भेडसावते, ती म्हणजे या मोठ्या नाइट पार्टीसाठी आकर्षक ड्रेस परिधान करण्यासोबत कशाप्रकारे ग्लॅमरस दिसावे. सुदैवाने, एण्ड टीव्हीवरील प्रमुख नायिकांनी काही सर्वोत्तम फॅशन व मेक-अप टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामधून तुम्ही प्रत्येक सेलिब्रेशन पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची खात्री मिळेल. या अभिनेत्री आहेत नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्णा देवी वाजपेयी), स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी). मालिका ‘अटल’मध्ये कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ”विंटर पार्टी आकर्षक दिसण्यासंदर्भात प्रयोग करण्यासाठी सर्वोत्तम काळ असतो. आकर्षक ड्रेससोबत वेल्वेट ब्लेझर परिधान केल्यास उबदार राहण्यास मदत होते, तसेच ग्लॅमरस लुक कायम राहतो. मेक-अपसंदर्भात मेटलिक आयशॅडोजसह डोळे लक्षवेधक बनवा आणि संतुलित, पण लक्षवेधक लुकसाठी ओठांना आकर्षक लिप-स्टिकचा वापर करा.” मालिका ‘भीमा’मध्ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्हणाल्या, ”समकालीन पेहराव देखील हिवाळ्यामध्ये अनुकूल असू शकतो, ज्यामुळे तुम्ही सिल्क किंवा वेल्वेट साड्यांसोबत समकालीन ब्लाऊजऐवजी सुशोभित जॅकेट्स परिधान करू शकता. त्यामधून शाही लुक मिळतो आणि उबदारपणा देखील मिळतो. हायलाइटर आणि क्लासिक विंज आयलाइनरसह तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक लक्षवेधक करा. सायंकाळच्या पार्टीसाठी मी डिप बेरी लिप शेडला प्राधान्य देते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”सेलिब्रेशन्सदरम्यान देखील आरामदायीपणा महत्त्वाचा आहे. आकर्षक जम्पसूट किेंवा सर्वोत्तम पँटसूटसह लक्षवेधक इअररिेंग्स नववर्ष पूर्वसंध्या पार्टीसाठी ट्रेण्डी व व्यावहारिक आहे. नवीन व आकर्षक लुकसाठी डेवी बेस, रोझी चीक्स व ग्लॉसी लिप वापरुन पहा. रात्रभर मेक-अप राहण्यासाठी त्यावर फिक्सिंग स्प्रेचा वापर करण्यास विसरू नका.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये लोकप्रिय अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”फ्यूजन वेअर विंटर पार्टीसाठी परिपूर्ण आहे. मला लेहंगा स्कर्टसोबत टर्टलनेक टॉप किंवा क्रॉप स्वेटर परिधान करायला आवडते. ते स्टायलिश व अद्वितीय आहे. स्मोकी आईजसह चमकदार व आकर्षक रेड लिप त्वरित लुक अधिक आकर्षक करतात. चोकर नेकलेससह लुक अधिक लक्षवेधक करा. या टिप्ससह आकर्षक दिसत नववर्ष पार्टीसाठी सज्ज रहा आणि प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घ्या.”