no images were found
स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास 14 जुलै पर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांकडून दि. 31 मार्च 2023 पर्यत स्वाधार योजनेचे अर्ज मागविण्यात आलेले होते. क्षेत्रीय कार्यालये, विविध संघटना, पालक, विदयार्थ्यांच्या मागणीनुसार शासनाने शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास दि. 14 जुलै 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. स्वाधार योजनेकरीता ज्या विदयार्थ्यांनी सन 2022-23 साठी अर्ज केलेला नाही त्यांनी दि.14 जुलै 2023 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, विचारे माळ कोल्हापूर येथे अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना इयत्ता 11 वी , 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या व महाविदयालय ज्या महानगरपालिका यांच्या हद्दीत आहेत त्या महानगरपालिका हद्दीच्या 5 कि.मी.परीसराबाहेरील विदयार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विदयार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विदयार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.