Home शासकीय दुधगंगा नदी व कालवा भागातील सर्व ओढे व नाल्यावरील दोन्ही तीरावर उपसाबंदी

दुधगंगा नदी व कालवा भागातील सर्व ओढे व नाल्यावरील दोन्ही तीरावर उपसाबंदी

16 second read
0
0
58

no images were found

दुधगंगा नदी व कालवा भागातील सर्व ओढे व नाल्यावरील दोन्ही तीरावर उपसाबंदी

        कोल्हापूर : दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये तसेच दुधगंगा नदी व कालवा भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

        दिनांक 16 जून 2023 ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी करण्यात आली आहे. या उपसाबंदी क्षेत्रात दुधगंगा नदी (धरणस्थळ ते दत्तवाड को.प.बंधारा) दुधगंगा उजवा मुख्य कालवा (लिंगाचीवाडी ते ब्रिद्री कालवा दुभाजक), दुधगंगा डावा कालवा (धरण ते कागल तालुक्यातील पिंपळगाव) या भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर 16 जून ते पुढील आदेशापर्यंत या कालावधीसाठी उपसाबंदी करण्यात येत आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …