Home Uncategorized  महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

 महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

5 second read
0
0
28

no images were found

 महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : हवामान खात्याकडून बिपरजॉय चक्रिवादळाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.

बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत.

राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे .दरम्यान पुढील 2-3 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 दरम्यान बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, 15 जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…