no images were found
नुपूर शर्मा होती निशाण्यावर; रशियात पकडलेल्या IS सुसाईड बॉम्बरचा खुलासा
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटमधील (IS) आत्मघाती बॉम्बर, ज्याला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) म्हणूनही ओळखले जातं, तो सध्या रशियामध्ये अटकेत आहे. त्याला भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याचं एकमेव काम देण्यात आलं होतं, असं गुप्तचर सूत्रांनी सीएनएन-न्यूज 18 ला सांगितलं.
1992 मध्ये जन्मलेल्या अझामोव्हची आयएसने तुर्कीमध्ये भरती केली होती, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले होते. शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे, असं अझामोव्हचं मत होतं आणि त्यामुळेच नुपूर शर्मा यांना मारण्याचा तो प्रयत्न करत होता, असं सूत्रांनी सांगितलं. रशियातून भारतात येताना त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होती. त्याचवेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली.
योजनेचा एक भाग म्हणून त्याला भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी रशियाला पाठवण्यात आलं. नवी दिल्लीत आल्यावर त्याला स्थानिक मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. त्याच्या चौकशीदरम्यान, अझामोव्ह म्हणाला की तो ऑनलाइन कट्टरपंथी झाला होता आणि तो त्याच्या कोणत्याही नेत्याला भेटला नव्हता. सूत्रांनी सांगितलं की, ऑपरेशनच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून त्याला रशियाला पाठवण्यात आलं होतं.
27 जुलै रोजी एका परदेशी दहशतवादविरोधी एजन्सीने भारताला रशियामध्ये अटक केलेल्या बॉम्बरची माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानमधील दोन आत्मघाती हल्लेखोर भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी तयार होते. त्यापैकी एक तुर्कीमध्ये होता.