no images were found
मंत्रालयासमोरच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत बोलत होते. नेमकं त्याचवेळी मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या शेतकऱ्याने स्वत: पेटवून घेतले. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोरच एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मनाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी आहे. आज दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बजाज भवन जवळ फुटपाथ वरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक याठिकाणी सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हाडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी गस्तीवर असलेले पोलिसांनी आणि विशेष शाखा, फायर किट टीम मधील आंगणे यानी तत्काळ आग विझून त्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे मदतीने जीटी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले आहे. ‘जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्याने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हात यामध्ये भाजला आहे, त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी अधिवेशनामध्ये माहिती दिली.