Home सामाजिक बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

0 second read
0
0
27

no images were found

बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. यासोबत महाराष्ट्र सरकारचा कायदाही वैध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण आहे. एकमेकांना पेढे भरवत शेतकऱ्यांनी हा आनंद साजरा केला. 

शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मी महाविकास आघाडी सरकारचे आणि आताच्या शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतो. सरकारने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या, संघटनांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालं. सगळ्यांचे आभार, असं खासदार अमोल कोल्हे म्हणालेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. सरकारने केलेला कायदा हा वैध असल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. याचा आनंद आहे. सगळ्याचं अभिनंदन, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

सर्वोच्च न्यायलयाच्या या निर्णयावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सगळा अहवाल तयार केला. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले पाहिजेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…