
no images were found
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धारामय्या यांची निवड, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या नावावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.तर कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज बंगळूरमध्ये करणार आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत तीन दिवस चर्चेचा खल झाल्यानंतर सिद्धारामय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदी निश्चित करण्यात आले.
दरम्यान, दुसरीकडे बंगळूरच्या कंठिरवा स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाचा हाती येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण रात्री खर्गे यांनी यावर तोडगा काढला.