no images were found
ट्विटरची टाळेबंदी; अर्ध्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीसह जगभरातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरच्या ७५०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरचे भारतात २५० कर्मचारी होते. त्या सर्वांना काढून टाकण्यात आले आहे. अभियांत्रिकी, विक्री, विपणन आणि कम्युनिकेशन टीममधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. भारतातील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागाची संपूर्ण टीम बरखास्त करण्यात आली आहे.
ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याला त्याच्या सहकाऱ्यांना काढून टाकण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी मेल मिळाले आहेत. याआधी गुरुवारी एका ई-मेलमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांना तात्पुरते कार्यालयात येण्यास मनाई केली होती. कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसला जात असाल तर घरी परत जा.
मस्क यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करून म्हटले की, कंपनीला दररोज ४ दशलक्ष डॉलर (३२.७७ कोटी रुपये) तोटा होत आहे, त्यामुळे आमच्याकडे कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना तीन महिन्यांची भरपाई देण्यात आली आहे, जी कायद्याने दिलेल्या रकमेपेक्षा ५० टक्के जास्त आहे.
ट्विटर कर्मचाऱ्यांना तीन प्रकारचे ई-मेल मिळत आहेत. एक ई-मेल ज्यांना काढून टाकण्यात आले नाही त्यांच्यासाठी आहे. एक ई-मेल ज्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांच्यासाठी आहे. तर एक मेल त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या नोकर्याे अद्याप अडचणीत आहेत. कर्मचारी कोर्टात
कामावरून काढून टाकण्यात आलेल्या ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात क्लास-ॲक्शन लॉ खटला दाखल केला आहे. कंपनी पुरेशी सूचना न देता हे सर्व करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हे फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन आहे.