no images were found
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनंतर भारताला मोठे यश
मुंबई : मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यातील मोठी अपडेट समोर आली आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यताही दिली. त्यामुळे भारताला हे मोठे यश मिळाले आहे.
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने अलीकडेच राणा यांच्या अभियोगासोबत झालेल्या भेटीबाबतची स्टेटस कॉन्फरन्स नाकारली होती. मात्र, आता अमेरिकन न्यायालयाने भारताच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.