no images were found
मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ते टिकले पाहिजे ही भूमिका आमची आहे. आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे फायदे मिळतात ते देत आहोत. आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात आज मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अखेर संपली आहे. या बैठकीमुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.
देशात फक्त तमिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारचा कायदा केला. आमचे सरकार बदललं आणि 9 सप्टेंबरला 2020 ला स्थगिती आली. उद्धव ठाकरे एक वर्षे मुख्यमंत्री होते. 2021 पासून उद्धव ठाकरे तुम्ही वटहुकूम का काढला नाही? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.
ओबीसी आरक्षणाप्रमाणे मराठ्यांना अनेक तरतुदी लागू केल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणबाबत अतिशय गंभीर आहे. जालना घटनेवरुन सध्या राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीने अनेकदा घोळ घातला. हे आरक्षण महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात घालवले. मराठा आरक्षणासठी केवळ महायुतीने निर्णय घेतले आहेत. जे नेते मराठा समाजाचा पुळका आला असे दखवत आहेत त्यांनी आरक्षण घालवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मराठा समाजाला आवाहन करतो की जो बंद चालला आहे एसटी जाळली त्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. या पूर्वी मराठा समाजाची जी आंदोलन झाली त्याचे देशपातळी कौतुक झाले आहे. पण आता गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आज जी बैठक झाली त्यात सकारात्मक चर्चा झाली. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. लवकरच तोडगा निघेल, मात्र तोपर्यंत शाांतता राखा, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.