no images were found
दोन दिवस कार्यक्रमांना गैरहजरीनंतर आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजेरी
मुंबई : अजित पवार मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित झाले आहेत.
जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन सरकारने चिरडून टाकलं. पोलिसांनी मागेपुढे न पाहता आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला. या घटनेने महाराष्ट्रात वेगळे वळण लागले.
संपूर्ण राज्यात पोलिसांच्या आणि शासनाच्या भूमिकेवर टीका होत असताना अजितदादाही झाल्या प्रकाराने नाराज असल्याची माहिती आहे. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांची बाजू सावरत असताना दुसरीकडे मात्र अजितदादांनी पोलीस दोषी असल्याचंच थेट फेसबुकवरून म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा शब्द राज्यातील नागरिकांना दिला आहे .
दरम्यान, सराटी आंतरवलीमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते भेटी देत असताना दुसरीकडे अजितदादांनी मात्र सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्याची देखील माहिती आहे.
मराठा समाजाचा वाढता रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या आरक्षणाप्रकरणी महत्त्वाची बैठक पार पडतीये.
दरम्यान, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी, पुण्यातील दोन-तीन कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजित पवार पवार उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा, तुम्ही एक तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या, नाही तर त्यांची साथ तरी सोडा. राज्यातील मराठा समाज तुमच्याकडे खूप आशेने बघतो अशी आग्रही मागणी अजितदादांच्या गावकऱ्यांनी म्हणजे काटेवाडीच्या तरुणांनी केलीये.