no images were found
शिवरायांच्या 350 व्याराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गडकिल्ल्यांसाठी 350 कोटीची तरतूद – चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजीनगरच्या पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
महाराष्ट्र स्थापनेच्या आपणास शुभेच्छा! हुतात्म्यांच्या स्मृती अभिवादन करतो. 1960 साली आजच्या दिवशी आपल्या महान महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे राज्य घडवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 108 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांना विनम्र अभिवादन! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो. आपल्या राज्याला राज्यगीत मिळालं आहे. त्याचा आनंद आहे. महाराष्ट्र सुधारक, गडकिल्ले, ही आपली ओळख आहे. या सगळ्याची जपणूक करणं गरजेचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
यासोबतच त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभं करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांसाठी 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असंही चंद्रकातं पाटील यांनी सांगितलं आहे.