
no images were found
जिनगोंडा आप्पा पाटील यांच्याकडून भगवान महावीर अध्यासनास ५० हजारांची बृहतदेणगी
भगवान महावीर अध्यासनास ५० हजारांची बृहतदेणगी श्री. जिनगोंडा आप्पा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी ५०,००० रु. अशी बृहत देणगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचेकडे सुपूर्द केली. या प्रसंगी मा. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, मा. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, चंदन डवर, प्रा. बी. डी. खणे व सौ. पुष्पाताई पाटील उपस्थित होते. श्री जिनगोंडा पाटील हे मूळचे कोगनोळी येथील असून कागल येथील यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये (पूर्वीचे कागल विद्यालय) शिक्षक होते. सदर बृहत देणगीबद्दल कुलगुरूंसह सर्व उपस्थितांनी त्यांना धन्यवाद दिले. भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसाप्रेमी व्यक्ती व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक, भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस (१००%) पात्र आहे. सदर देणगी ऑनलाईन व क्यूआर कोडने देणेची सुविधा उपलब्ध आहे. तरी देणगी द्यावयाची असल्यास डॉ.विजय ककडे 9422423941 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.