Home शासकीय सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रचार, प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रचार, प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न

28 second read
0
0
48

no images were found

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रचार, प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न

  कोल्हापूर : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक क्रांती विचार मंच बोरवडे येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी समतादुत किरण चौगुले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, वसतिगृह योजना विविध  शिष्यवृत्ती योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, विविध महामंडळे अशा अनेक योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  एल. कांबळे यांनी केले. यावेळी अधीक्षक केरबा पारदोले, सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे, पोलीस पाटील गौतम  कांबळे, एल. कांबळे,  मनोहर कांबळे, अभिलाष कांबळे, विलास कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

समाज कल्याण कार्यालयामार्फत्त मौजे वसगडे ता.करवीर येथे समाज कल्याण विभागाच्या  योजनांच्या  प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी वसगडे गावच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, वसतिगृह योजना, निवासी शाळा, आश्रमशाळा, विविध शिष्यवृत्ती योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, विविध महामंडळे, बार्टीच्या योजना, रमाई आवास योजना, ॲट्रॉसिटी योजना, परदेशी स्कॉलरशिप योजना अशा अनेक योजनांची  माहिती  त्यांनी  यावेळी दिली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साळुंके तर आभार आशा रावण यांनी मानले. कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, सरपंच योगिता बागडी, समतादूत आशा रावण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते शीतल कांबळे ,आनंदा कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…