no images were found
महामानवांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी प्रबोधनात्मक गीत महत्त्वाचे माध्यम- विशाल लोंढे
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय परवांतर्गत समता रजनी या उपक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समाजामध्ये पोहोचण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दीपस्तंभ क्रांतीचा नारा प्रणित निर्माता सुरज नाईक आणि सहकारी यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, मध्यवर्ती जयंतीचे अध्यक्ष, जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील अबाल वृद्ध तसेच मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी गीतांचा आनंद लुटला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.