no images were found
१६ आमदार अपात्र ठरले, तरीही सरकार स्थिर : अजित पवार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.मात्र आपण अमित शहा यांना भेटलो नाही. 16 सेना आमदार अपात्र ठरले तरी संख्याबळाचा विचार करता भाजप सरकारला धोका नाही, अशी तडाखेबाज टोलेबाजी करीत विविध चर्चा त्यांनी निरर्थक ठरविल्या.
अजित पवार म्हणाले, मला एक कळत नाही की, दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादा भुसे बोलले. अनेकांची वक्तव्ये मी ऐकली. या सगळ्यांचे एवढं प्रेम का ऊतू चालले आहे ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही, आले तर भाषण करणार की नाही करणार, बसणार तर कुठे बसणार, अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती, अशी मिश्कील टोलेबाजीही त्यांनी केली.
पवार यांनी सत्ताधार्यांकडील सदस्यांच्या आकडेवारीबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, अपक्ष धरून भाजपकडे ११५ आमदार आहेत. एकनाथ शिंदेंकडे ४० आमदार आहेत. ही संख्या १५० होते. शिवाय १० अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे ही संख्या १६५ होते. त्यातील १६ आमदार कमी झाले तर त्यांच्याकडे १४९ आमदार उरतात. बहुमतासाठी १४५ आमदारांची गरज आहे. मग कारण नसताना वावड्या उठवण्याचे काम का सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेलाही पवार यांनी पूर्णविराम दिला.ते म्हणाले, भेट कुठे झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनेल त्यांच्या पाठीशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले.