Home सामाजिक संस्कारीत पिढीचं उन्नत राष्ट्र निर्माण करू शकते : चंद्रकांतदादा पाटील 

संस्कारीत पिढीचं उन्नत राष्ट्र निर्माण करू शकते : चंद्रकांतदादा पाटील 

1 second read
0
0
30

no images were found

संस्कारीत पिढीचं उन्नत राष्ट्र निर्माण करू शकते : चंद्रकांतदादा पाटील 

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून शहरातील अनेक भागांत लहान मुलांना संस्कार, खेळ, सर्वांगीण विकासासाठी खेळघराच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.

कोल्हापुरात विविध ठिकाणी असणाऱ्या ६७ खेळधरांमधली मिळून १,००० मुले १५० ताई यांच्यासह निमंत्रित मान्यवर अशा सर्वांचाच वाढदिवस आज औक्षण व भेटवस्तू देऊन संपन्न झाला.
अयोध्या हॉटेल याठिकाणी दिमाखदार झालेल्या कार्यक्रमात स्नेहभोजन व आईस्क्रीम यांनी बच्चे मंडळी आणखी खुश झाली. खेळघरचे कुटुंब प्रमुख .मा . चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री) यांनी सर्व ताईंना मुलांसाठी आणखी करावयाच्या कामाच्या व्याप्ती ची कल्पना दिली व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आजची मुले ही स्वतंत्र आणि श्रेष्ठत्वाकडे जाणाऱ्या भारत देशात जन्मलेली पिढी आहे. त्यांनी ध्येयही श्रेष्ठत्त्वाकडे जाणारे ठेवावे व प्रयत्नही तसेच श्रेष्ठ दर्जाचे करावे असे त्यांनी मुलांना सांगितले. मुलांसाठी त्यांनी केलेल्या मदतीचे किस्से मुलांना आणि ताईंनाही अधिकच प्रेरणा आणि आश्वासक आधारदायक वाटले. मा.दादांचे औक्षण झाल्यानंतर त्यांनी स्वतः सपत्नीक थोड्या मुलांचे औक्षण केले व भेटवस्तू देऊन आशीर्वादही दिले. या प्रसंगी श्री राजीव कुलकर्णी, श्री कृष्णराव माळी, श्रीमती शीतल राईलकर, श्री राहूल चिकोडे, श्री यादव यांचेही सत्कार करण्यात आले. खेळघरांनी केलेल्या श्री धान्य विषयक प्रकल्पांचे छोटे प्रदर्शन या निमित्ताने मांडले होते. खेळघर संचालिका सौ. सुमेधा कुलकर्णी व सौ.जुई कुलकर्णी यांनी सौ.कविता मोहिते, सौ.चित्रा कशाळकर यांच्या मदतीने सर्व कार्यक्रमाचे नियोजन-संयोजन केले.
खेळघर लीडर ताई प्रज्ञा हेर्लेकर, अपर्णा कुलकर्णी, संपदा कांबळे , पूजा लिंगम, सारिका रणदिवे, मंगल कांबळे, अर्पिता चव्हाण, ऐश्वर्या पालकर आदींसह अन्य ताई यांचेही मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…