
no images were found
गोव्यात झिगझॅग व्होडका अनुभवा
गोवा : मद्य व्यवसायात सर्वात अलिकडे प्रवेश करणारा झिगझॅग व्होडका गोव्यात लॉंच करताना आम्हाला उत्साह वाटत आहे. व्होडका निर्मितीकौशल्यात झिगझॅग एक नवीन उच्चांक स्थापित करत आहे आणि ताजा व नितळ, कडक तसेच निवांत असा ड्रिंकचा अनुभव देऊ करत आहे. या लॉंचद्वारे, झिगझॅग संपूर्ण भारतात विस्तार करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने एक लक्षणीय पुढचे पाऊल उचलत आहे.झिगझॅग व्होडका काळजीपूर्वक प्रकारे पाच वेळा गाळला आणि चार वेळा कार्बन, चांदी, प्लॅटिनम आणि सोन्यातून फिल्टर केला जातो व या मुळे अतुलनीय शुध्द आणि आनंददायक मद्यपान अनुभवाची खात्री होते. कॉकटेल्स मध्ये मिश्रण करून किंवा ऑन द रॉक्स वा नीट घोट घेत घ्या; झिगझॅग व्होडकाचा सहज दरवळ सर्वांच्या रुची पूर्ण करतो.परंतु झिगझॅग केवळ आणखी एक मद्य नाही- ते एक जीवनशैली आहे. “कधीही सरळ चालू नका” या ब्रॅंडच्या धाडसी ब्रीदवाक्याचा पुरेपूर अंगिकार करत झिगझॅग त्यांच्या ग्राहकांना अपारंपारिक शैली जवळ करण्यास आणि चाकोरीची वाट सोडून धमाल करण्यास उत्तेजन देतो. अनन्य व्यक्तीश: छाप आणि वैयक्तिकतेवर ध्यान केंद्रित करून, झिगझॅग गोव्याच्या सामाजिक वातावरणात खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे.
तेथिल उत्साही तरुणाई, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि उच्च कोटीच्या अनुभवांवरील प्रेम या मुळे गोवा झिगझॅगच्या पदार्पणाकरिता आदर्श बाजारपेठ आहे. हा ब्रॅन्ड गुंगवून टाकणारे अनुभव, प्रभावकारी सहकार्य आणि अग्रणी मिक्सॉलोजिस्ट्स व बार्टेंडर्सेसह भागिदारी याद्वारे चैतन्यशील गोवेकरांशी नाते जुळवू इच्छितो आणि अशा प्रकारे गोव्याच्या नाइटलाइफमध्ये महत्त्वपूर्ण बनण्याची खात्री करतो.लॉंचचा दिनांक पासून, झिगझॅग व्होडका गोव्यातील निवडक रिटेल दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मिळू लागेल. रिटेल दुकानांत रु 120, रु 240 व रु 480 किंमतीत अनुक्रमे 180 मिली, 375 मिली आणि 750 मिली या आकारात विविध प्रकार उपलब्ध होतील. झिगझॅगची सर्व उत्पादने जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रतिभा असणार्या व गुणवत्तेची कदर करणार्या व्यक्तींसाठी कौशल्याने निर्माण केली आहेत.