no images were found
म्यानमार सैनिकांकडून आपल्याच माणसांवर केला एअर स्ट्राइक; १०० जणांचा मृत्यू
भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये सध्या अशांतता आहे. तिथे सैन्याने सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. या विरोधात तिथली जनता उठाव करत असते. म्यानमार सैन्याकडून चक्क एका गावावर एअर स्ट्राईक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लहान मुले, पत्रकारांसह तब्बल १०० लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते.
म्यानमार मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने सकाळी ८ वाजता तब्ब्ल १५० लोकांच्या जमावावर बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला.बॉम्ब हल्ल्यात तब्बल १०० लोकांचा जागीच मृत्यू झाला तर मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० 20-30 बालकांचा समावेश आहे सरकार विरोधात उभ्या राहिलेल्या सशस्त्र गटाच्या नेत्याचा सुद्धा या एअर स्ट्राइकमध्ये मृत्यू झाला.
सुरुवातीला हवाई हल्ला झाला. त्यानंतर अर्ध्यातासाने हेलिकॉप्टर तिथे आलं. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हवाई हल्ल्यात नेमका किती जणांचा मृत्यू झालाय, ते अजून स्पष्ट नाहीय. पण लष्करी सरकारने रिपोर्टिगवर निर्बंध घातले आहेत. रात्री म्यानमारमधील शासकांनी हल्ला केल्याचा कबूल केलं.