no images were found
अदानी प्रकरणात जेपीसीची चौकशीला विरोध नाही, पण…
पुणे : वीस हजार कोटींच्या आरोपांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवलं आहे. या प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र अशा समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीला विरोध करत नाही, पण जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती अधिक उपयुक्त ठरली असती. १९ विरोधी पक्ष एकत्र आले, पण जेपीसीत त्यांना स्थान मिळणार नाही, भाजपच्या लोकांना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. राहुल गांधींनी आरोप केलेल्या १९ हजार कोटींच्या आकडेवारीबाबत माझ्याकडे माहिती नाही. देशात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्यावर भाष्य करणं मला महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडून मिळते, अदानींचं कौतुक नाही, पण त्यांचं योगदान मान्य करावं लागेल, तसेच अदानी यांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत आहे असं आम्हाला वाटत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जेपीसीत सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे जेपीसी गठीत करून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच अधिक योग्य राहिलं. दरम्यान सध्या सावरकरांच्या मुद्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे ग्रुप सावरकरांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.