no images were found
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर -जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम
कसबा बावडा :(प्रतिनिधी )येथील डॉ.डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर पार पडले . पॉलिटेक्निक मधील हिरकणी म्हणजे पुढाकाराने झालेल्या या उपक्रमासाठी रोटरी क्लब कोल्हापूर रॉयल्स आणि रोट्रॅक्ट क्लब कोल्हापूर रॉयल्स, युवा ग्रामीण विकास संस्था यांच्या सहकार्याने उपक्रम झाला यावेळी डॉ.संगीता निंबाळकर आणि रितू गर्ग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.संगीता निंबाळकर म्हणाल्या, विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. योग्य व्यायाम संतुलित, आहार याला प्राधान्य द्यायला हवे. मासिक पाळीचे वेळी शरीरात बदल होत असतात. या बदलाकडे लक्ष देवून योग्य ती स्वत:ची काळजी घ्यावी.यावेळी रितु गर्ग यांनी ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड बद्दल माहिती दिली. रोटरीतर्फे महिला आणि विद्यार्थीनींमध्ये आरोग्याबद्दल जागृती होणेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणे येत असल्याचे रोटरी रॉयल्सच्या अध्यक्षा सविता पाटील यांनी सांगितले.प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पॉलीटेक्नीक मधील हिरकणी मंच हा खास विद्यार्थीनींच्या उपक्रमासाठी कार्यरत असल्याचे सांगून या माध्यमातून स्वसंरक्षण, आरोग्य जागृती याला प्राधान्य दिल्याचे सांगितले.
यावेळी रोटेरियन वारणा वडगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. हिरकणी मंचच्या समन्वयक प्रा. वृषाली पाटील यांनी आभार मानले. तर सृष्टी पाटोळे हिने सुत्रसंचालन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. मिनाक्षी पाटील, असिस्टंट रजिस्ट्रार सचिन जडगे, युवा ग्रामीण विकास संस्था समन्वयक मोहन सातपुते यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.