no images were found
२५ वर्षांखालील ३३ टक्के महिलांना स्थूलतेचा धोका
कोल्हापूर, : ७ एप्रिल २०२३ रोजी असणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडस हेल्थ प्लसने केलेल्या संशोधनामधून निदर्शनास आले की, २५ वर्षांखालील ३३ टक्के महिलांना आणि २७ टक्के पुरूषांना अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी, बैठेकाम करण्याची जीवनशैली, वाढता तणाव आणि मद्यपान व तंबाखूचे सेवन या कारणांमुळे लठ्ठपणा होण्याचा धोका आहे. या संशोधनामध्ये जवळपास २००० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यांची जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यात आली.
इंडस हेल्थ अॅब्नॉर्मलिटी अहवालामधून निदर्शनास येते की, २५ टक्के महिलांना व १८ टक्के पुरूषांना मधुमेह होण्याचा धोका आहे. करण्यात आलेल्या सर्व तपासण्यांपैकी कोल्हापूरमधील ५० टक्के महिलांना व ४२ टक्के पुरूषांना एथेरोस्क्लेरोसिस होण्याचा धोका आहे.
इंडस हेल्थ प्लसचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विशेषज्ञ श्री. अमोल नायकवडी म्हणाले, ‘‘तरूणांमध्ये लठ्ठपणाचे उच्च प्रमाण दिसून येत आहे. कोल्हापूरमधील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी, बैठेकाम करण्याची जीवनशैली यामुळे लठ्ठपणा व मधुमेहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मधुमेह होण्याचा धोका कमी करणयसाठी वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहारामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो. तसेच निदर्शनास आले आहे की, कोविडनंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि तरूण पिढी व कुटुंबातील सदस्यांसह नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यास येत आहेत.’’