
no images were found
नॉट रिचेबल अजित पवारांनी केला खुलासा
राज्यात विरोधीपक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, त्यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.दरम्यान अजित पवार सहपत्निक थेट पुण्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या शोरूमचे सकाळी साडेनऊच्या सुमारास उद्घाटन झाले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘अजित पवार नॉट रिचेबल’ या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले “मी सतत दौरे करत असतो त्यामुळे जागरण होत असतो माणूस आहे कधी आजारी पडू शकतो काल मला पित्ताचा त्रास झाल्यामुळे बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी औषध घेऊन विश्रांती घेतली परंतु माध्यमातून विपर्यास करण्यात आला.”
पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भात, कोणत्याही प्रकारची चर्चा महाविकास आघाडी झालेली नाही. याबाबतची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. मुळात ही पोट निवडणूक केव्हा होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, निवडणूक आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले