Home क्राईम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

3 second read
0
0
25

no images were found

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली :  अनेक दिवसांपासून देशभरातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत असूनही धमक्यांचे प्रकार थांबलेले नाही. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.एका वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्याने पोलिस स्टेशन सेक्टर-20 मध्ये तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 16-A येथील एका वाहिनीचे व्यवस्थापक विजय कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्या कंपनीचे सीएफओ कुशन चक्रवर्ती यांना अज्ञाताने ई-मेल पाठवला आणि त्यात देशाच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली’.

दरम्यान, या प्रकरणी नोएडा पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाणार असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी मनोज कुमार सिंह यांनी  केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांची चौकशी सुरू केल्याचे समजते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…