Home क्राईम संशयातून पुण्यातील महिलेसह दोन चिमुकल्यांना ठार मारून जाळलं

संशयातून पुण्यातील महिलेसह दोन चिमुकल्यांना ठार मारून जाळलं

1 second read
0
0
34

no images were found

संशयातून पुण्यातील महिलेसह दोन चिमुकल्यांना ठार मारून जाळलं

पुणे  : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून त्यांचा खून करून तिघांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीट, लाकडे यांच्या साह्याने मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वैभव वाघमारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, ( वय ३०, मूळ राहणार लोहोटा तालुका, औसा जिल्हा लातूर), असे आरोपीचे नाव आहे. तर महिला आम्रपाली वाघमारे ( वय २५ रा पिसोली कोंढवा) मुलगी रोशनी (वय ६ ) मुलगा आदित्य ( वय ४ ) असे मृत झालेले व्यक्तींची नावे आहेत. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीरा सोबत अनैतिक संबंध समोर आलेल्या माहितीनुसार आम्रपाली वाघमारे या महिलेचे तिचा दीर वैभव वाघमारे याच्यासोबत अनैतिक संबंध होते.

ती वैभवसोबत पुण्यातील पिसोळी परिसरात राहत होती. मात्र आम्रपालीचे आणखी कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यातून त्यांचा वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात वैभवनं आम्रपाली व  तिच्या दोन लहान मुलांना गळा दाबून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिघा मायलेकरांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आणला. त्यानंतर घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…