Home धार्मिक गुलालाने रंगला ज्योतिबा डोंगर, यात्रेचा आज मुख्य दिवस

गुलालाने रंगला ज्योतिबा डोंगर, यात्रेचा आज मुख्य दिवस

1 second read
0
0
72

no images were found

गुलालाने रंगला ज्योतिबा डोंगर, यात्रेचा आज मुख्य दिवस

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. जोतिबा डोंगरावर रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. चांगभलंच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत . तीन दिवस चालणाऱ्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता महाभिषेक महापूजा, तर १० वाजता धुपारती सोहळा. हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.

मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १४५ सीसीटीव्ही च्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, व्हाईट आर्मी, ग्रामपंचायत, देवस्थान समितीच्या वतीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते ज्योतिबा अशी २४ तास एसटीची सुविधा आहे. बैलगाडी, खाजगी वाहनातून, पायी चालत भाविक डोंगरावर आले आहेत.

दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ झाली . पहिला मान निनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो. मानाच्या १८ सासनकाठ्या तर एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० ते ८० फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…