
no images were found
भाजपा कोल्हापूरच्या वतीने दिनांक 04 रोजी सावरकर गौरव यात्रा- राहूल चिकोडे
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्याबाबत आज भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली.
जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या बैठकीत उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही सावरकर गौरव यात्रा विविध सामाजिक संदेश देत यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा प्र. का सदस्य महेश जाधव यांनी सावरकरांचा इतिहास आणि विविध घटनांचे विस्तृत विवेचन कार्यकर्त्यांना केले.
कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन मंगळवार दिनांक 4 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. मिरजकर तिकटी याठिकाणी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समस्त सावरकर प्रेमी, हिंदुत्ववादी संघटना, याठिकाणी एकत्र येत मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – पापाची तिकटी – छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी या गौरव यात्रेचा समारोप होणार आहे.प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबर युती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास युवा पिढी समोर येण्यासाठी दिनांक 4 रोजी सायंकाळी 4 वाजता सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सावरकर प्रेमी जनतेने मिरजकर तिकटी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, हेंमत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, विजय खाडे, अजित ठाणेकर, विजय आगरवाल, गायत्री राऊत, गिरीष साळोखे, डॉ राजवर्धन, रमेश दिवेकर, रवींद्र मुतगी, विवेक वोरा, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, अमेय भालकर, सचिन सुतार, समीर यवलुजे, तौफिक बागवान, किरण कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.