Home क्राईम सांगली कुपवाड भागातील वादग्रस्त  प्रार्थनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

सांगली कुपवाड भागातील वादग्रस्त  प्रार्थनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

2 second read
0
0
57

no images were found

सांगली कुपवाड भागातील वादग्रस्त  प्रार्थनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.त्यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील वादग्रस्त  प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.तर जागेबाबत प्रांत कार्यालयामध्ये बैठक सुरु आहे.

गुढीपाडव्यानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या जाहीर भाषणात सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनी मधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. एक महिन्या पूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात दोनी  गटाकडून तक्रार केली होती.  त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.त्यानुसार 15 जणांच्यावर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,आणि सध्या याठिकाणी शांततापूर्ण वातावरण असल्याचे संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.वादग्रस्त जागा गुंठेवारी असून या ठिकाणी पत्र्याचे शेड उभे करुन चारही बाजूनी पत्र्यांनी बंदिस्त केले आहे. या जागेबाबत प्रांताधिकारी यांच्यासमोर बैठक सुरु असून महापालिकेच्या नगररचना विभागाने जागेवर येऊन मोजमापे घेतली आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…