no images were found
राज ठाकरे यांनी कुपवाड भागातील मशीदीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला
गुढीपाडव्यानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या जाहीर भाषणात सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनी मधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.त्यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता.त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. सदरची मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत असून कोणतेही परवानगी नाही. सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको,अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.