
no images were found
काय?? विवान वागलेंच्या घरामध्ये राहणार?
सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’मध्ये प्रत्येक वडील-मुलीचे नाते अद्वितीय असते आणि त्यांना विविध चढ-उतारांचा सामना करावा लागतो. प्रत्येक कथानकामध्ये भावनिक, पण प्रबळ संदेश देणारी मालिका ‘वागले की दुनिया’ प्रेक्षकांशी जुडण्याकरिता भारतीय कुटुंबांमधील दैनंदिन स्थितींना दाखवते. हास्य व ड्रामामध्ये संतुलन राखत सोनी सबवरील लोकप्रिय मालिकेचे आगामी एपिसोड्स राजेशमधील अतिसंरक्षणात्मक वडील कशाप्रकारे जागृत होतात या बाबीला दाखवतात, विवानच्या घराचे नूतनीकरण केले जात असते, ज्यामुळे तो भाड्याने फ्लॅट शोधत असतो आणि त्याला साई दर्शन सोसायटीमधील वागलेच्या घराजवळ फ्लॅट मिळतो.