Home मनोरंजन एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श

एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श

0 second read
0
0
104

no images were found

‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘हृदयी वसंत फुलताना’ या एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श

मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना.’ हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होऊन ३४ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं ‘टकाटक २’मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं. निर्मात्यांनी अगोदर ९० सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीतप्रेमींच्या मागणीनुसार निर्मात्यांनी संपूर्ण गाणे आजच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…