
no images were found
गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला धक्का; काही तासातच प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
जम्मू-काश्मीर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारीच (16 ऑगस्ट) काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक समित्यांचे प्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. आझाद यांच्या शिफारशींकडे काँग्रेसने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज असून, त्यामुळंच त्यांनी प्रचार आणि राजकीय समिती या दोन्ही पदांचा राजीनामा दिल्याची सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पद नाकारण्याचा निर्णय हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या मिशन काश्मीरला लागणार ब्रेक मानला जात आहे. कारण याच मिशन काश्मिरसाठी काँग्रेसने गुलाम नाबी आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष केले होते. त्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकांची रणनिती आखली जाणार होती. पण नियुक्तीच्या काही तासांमध्येच त्यांनी आपला राजीनामा दिला. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या निकटवर्तीयांनीही सांगितले की, त्यांना कोणतेही पद नको असल्याचे त्यांनी पक्ष नेतृत्वाला पूर्चवीच सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारीच नियुक्त झालेले जम्मू-काश्मीर काँग्रेसचे नवे अध्यक्ष विकार रसूल वानी हे गुलाम नबी आझाद यांचे खास मानले जातात.